कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतात आधार कार्ड हा नागरिकांच्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. सरकारी योजना, शैक्षणिक दाखले, बँक व्यवहार, मोबाईल सिम खरेदी यांसारख्या अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. केवळ प्रौढच नव्हे, तर लहान मुलांसाठीही आता आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. विशेषतः लहान मुलांसाठी ब्लू आधार कार्ड तयार केले जाते.
काय आहे ब्लू आधार कार्ड ?
ब्लू आधार कार्ड हे पाच वर्षांखालील बालकांसाठी तयार केलं जातं. यामध्ये बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. फक्त मुलाचं नाव, जन्मतारीख, लिंग आणि पालकांचे आधार क्रमांक यांचा समावेश असतो. हे कार्ड मुलाला पाच वर्षांचं होईपर्यंत वैध असतं, त्यानंतर त्याचे बायोमेट्रिक अपडेट करून नियमित आधार कार्डमध्ये रूपांतर करावे लागते.
आधीची अडचण
आधी ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी पालकांना लहान मुलांना आधार केंद्रावर घेऊन जावं लागायचं. नवजात किंवा कमी वयाच्या मुलांना घेऊन जाणं, त्यांच्या फोटोसाठी शांत बसवणं ही एक अवघड प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक पालकांसाठी ही गोष्ट त्रासदायक ठरत होती.
आता UIDAI अधिकारी घरी येणार
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) पालकांच्या सोयीसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. आता लहान मुलांचं ब्लू आधार कार्ड तयार करण्यासाठी पालकांना केंद्रावर जाण्याची गरज नाही. UIDAI चे प्रशिक्षित अधिकारी थेट घरपोच सेवा देतील. हे अधिकारी मुलाचा फोटो, आवश्यक दस्तावेज आणि इतर माहिती घेतात आणि संपूर्ण प्रक्रिया घरीच पूर्ण करतात.
प्रक्रिया काय आहे?
-
UIDAI च्या अधिकृत पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे अपॉइंटमेंट घ्या.
-
घरपोच सेवा निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
-
अधिकारी दिलेल्या वेळेनुसार आपल्या घरी भेट देतील.
-
अधिकारी मुलाचा फोटो आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
-
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत पोस्ट किंवा ई-आधारद्वारे ब्लू आधार कार्ड उपलब्ध होईल.
आवश्यक कागदपत्रे :
-
बालकाचा जन्म प्रमाणपत्र
-
पालकाचा आधार कार्ड
-
पत्ता पुरावा (जसे की वीज बिल, रेशन कार्ड इ.)
UIDAI च्या या उपक्रमामुळे पालकांची मोठी सोय झाली आहे. लहान मुलांना आधार कार्डसाठी केंद्रावर घेऊन जाण्याची गरज आता संपली आहे. ही सुविधा खास करून नवजात बालकांच्या पालकांसाठी एक दिलासा देणारी बाब आहे.
———————————————————————————————–



