कोल्हापूर : प्रसारमध्यम न्यूज
महायुती सरकारच्या कलंकीत आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मुंबईतील दादर परिसरात उबाठाने जनआक्रोश आंदोलन झाले. आंदोलनास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आहेत. आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. दरम्यान राज्यभरातील जिल्हा पालक कार्यालयांच्या समोर असे आंदोलन होत आहे. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून शालिमार येथे निदर्शने.
राज्यातील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट कार्यरत आहेत. या गटातील अनेक आमदार आणि मंत्री सत्तेच्या जीवावर मनमानी कारभार करत आहेत. वर्तनही मनमानी करत आहेत. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. जन्रेता वाढल्यास फक्त खाते बदल केला जातो मात्र कारवाई केली जात नाही. यामुळे या दोन्ही गटातील आमदार, मंत्री, पदाधिकारी स्वतःवर नियंत्रण ठेवत नाहीत. याचा अतिरेक होत असल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उबाठाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. दादर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून महायुती सरकारच्या कलंकीत आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणात बोलताना यापुढे महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा व्हावी असं म्हणत थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाने महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराबद्दल “कलंकीत” असलेल्या मंत्रींची हकालपट्टी करण्याची मुख्य मागणी मांडली आहे. हे आंदोलन “जनआक्रोश आंदोलन” म्हणून ओळखले जाऊ लागले असून राज्यभरातील जिल्हा पालक कार्यालयांच्या समोर अशा आंदोलने करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमधील, विशेषतः मध्यमश्रेणीचे आणि भ्रष्टाचारप्रकरणांत नाव अडकलेल्या, मंत्र्यांना या आंदोलनात लक्ष्य केले आहे. माणिकराव कोकाटे, योगेश कदम, दादाजी भुसे, जयकुमार गोरे, नितेश राणे, संजय राठोड आणि भरत गोगावले या मंत्र्याचा यामध्ये समावेश आहे.