सरकारच्या या महत्त्वाच्या अॅपची खासियत म्हणजे ग्रामस्थांना फोटो अपलोड करून अभिप्राय नोंदवता येणार आहे. तशी सुविधा यात केली आहे. एखादं काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल किंवा चांगलं काम झालं असेल, तर त्याचा फोटो टाकून सूचना किंवा तक्रार करता येते. त्यामुळे स्थानिक पातळीवर जबाबदारीची भावना वाढेल आणि चांगल्या प्रशासनाला चालना मिळेल.
‘मेरी पंचायत’ अॅप मध्ये ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशोब आता सर्वांसाठी खुला झाल्याने हा सर्वात मोठा फायदा आहे. कोणत्या कामासाठी किती रक्कम मंजूर झाली, प्रत्यक्षात किती खर्च झाला आणि अजून किती शिल्लक आहे, हे सर्व तपशील ग्रामस्थांना या अॅपच्या माध्यमातून मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे अनावश्यक गैरसमज दूर होऊन भ्रष्टाचारालाही आळा बसेल. तसेच प्रत्येक काम पारदर्शक व वेळेवर होईल.
——————————————————————————————–