दरवर्षी 7 जुलै रोजी संपूर्ण जगभरात ‘जागतिक चॉकलेट दिन’ साजरा केला जातो. चॉकलेटप्रेमींना आनंद देणारा हा दिवस फक्त गोड पदार्थ खाण्यापुरता मर्यादित नसून, चॉकलेटच्या इतिहासाची आणि त्याच्या लोकप्रियतेची आठवण करून देतो. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १५५० साली युरोपमध्ये प्रथमच चॉकलेट आणले गेले होते. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ २००९ पासून ७ जुलै हा दिवस ‘जागतिक चॉकलेट दिन’ म्हणून साजरा केला जातो.
चॉकलेटचा उगम मध्य व दक्षिण अमेरिकेतील माया आणि अझटेक संस्कृतीत झाला होता. त्यांनी कोकोचे उपयोग औषध आणि धार्मिक विधींमध्ये केला होता. युरोपमध्ये चॉकलेट आले तेव्हा सुरुवातीला ते केवळ उच्चभ्रू आणि राजघराण्यांमध्येच वापरले जात असे.
चॉकलेटचे प्रकार :
- डार्क चाॅकलेट- कडवट पण आरोग्यासाठी फायदेशीर.
- मिल्क चाॅकलेट – सामान्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय.
- व्हाईट चॉकलेट – कोको सॉलिड्सशिवाय तयार.
- फ्लेवर्ड किंवा फिलिंग चॉकलेट्स – नट्स, फळं, ट्रफल्स, वगैरे भरलेले.
डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. मूड चांगला ठेवण्यात मदत होते. हृदयासाठी काही प्रमाणात फायदेशीर. दोष : अति प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यास वजनवाढ,साखर वाढणे अशा समस्या होऊ शकतात.
चॉकलेट गोड असते, पण तिच्याशी जोडलेल्या आठवणी त्याहूनही गोड असतात. केवळ लहान मुलांनाच चॉकलेट आवडतात अस नाही तर अगदी आजी -आजोबांनाही चॉकलेट आवडतात. नातवाची आणि आजोबांची झालेली फुटी चॉकलेटमुळेच परत गट्टी होते.
हे ही वाचा….
कोल्हापूर जिल्ह्यातील आद्य पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळ येथील मंदिराचे महात्म्य पहा..खालील लिंकवर….