कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मध्य महाराष्ट्रासह दक्षिणेकडील जिल्ह्यांना मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाचा इशारा देत यलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. विभागाने पुढीस २४ तासांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर येथील घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, विदर्भातील अकोला, अमरावती इथंही पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणी अंदाजनुसार; २४ ते ३१ जुलै कालावधीत महाराष्ट्रासह, मध्य भारतातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून ३१ जुलै ते ७ ऑगस्ट कालावधीत मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली.
पावसाने गेल्या दोन दिवसापासून चांगलीच उघडीप दिली आहे. यामुळे सर्वांनाच हायसे वाटत आहे. पेरणीच्या कामाना वेग आला आहे. गाव, शहरात स्थानिक स्वराज्य संस्थाकडून नाला सफाईची काम जोरात सुरु आहे. अजून अडीच महिने पावसाळा असल्याने महापुराचा धोका उद्भऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाचे बंधारे, धरण यातील पाणी नियंत्रणात ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये पावसामुळे विघ्ने येऊ शकतात.
केंद्रीय हवामान विभागनं, १८ ते २५ जुलैपर्यंत देशातील बहुतांश राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यानच्या काळात काही राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यामुळं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
केरळ, दक्षिणी कर्नाटकचा अंतर्गत भाग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड , अंदमान आणि निकोबार बेट समुहांसह बिहार, छत्तीसगढ, पूर्व राजस्थान, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रगेश, जम्मू काश्मीर, लडाखसह दक्षिणी राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागनं वर्तविला आहे.
———————————————————————————————–