कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूरकरांचा दातृत्वाचा हात सुरूच आहे. काहींनी तर, शैक्षणिक साहित्याची मदत देखील जिल्हा काँग्रेस कमिटीत आणून दिली आहे. तर काहींनी ऑन लाईन जीवनावश्यक वस्तूं याठिकाणी पोहच केल्या आहेत. अगदी हातावरचे पोट असणाऱ्या लोकांनी देखील आपल्या परीने पूरग्रस्तांच्या साठी मदत दिली आहे.
कुणी धान्य देतंय, तर कोण रोजच्या वापरातील वस्तू, तर कोणी साबणाचे किट, कपडे अन् शैक्षणिक साहित्य. अशा स्वरूपात मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या करिता मदत सुरूच आहे. अनेकांनी जीवनावश्यक वस्तू, आणि साहित्य पूरग्रस्तांच्या करिता जमा केले. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी, त्यांच्या रोजच्या खाऊच्या पैशातून देखील याठिकाणी मदत दिली. अनेकांनी दातृत्वाची जागा घेतल्याने महापुराच्या संकटात सापडलेल्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.