कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावी परिक्षेचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या असून ते निकालाच्या तारखेची आणि मार्कशीट कधी हातात येईल याची वाट पाहत आहेत. यावर्षी, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च आणि बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली.
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत, आणि आता विद्यार्थी आणि पालकांना आतुरता आहे, म्हणजे दहावी बारावी बोर्डाचा निकाल केव्हा लागणार किती तारखेला लागणार या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही विद्यार्थी असेल किंवा १० वी व बारावी विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुमच्यासाठी माहिती आहे.
त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे, दहावी १२ वी बोर्डच्या परीक्षेसाठी सुरू असताना दहावीचा पेपर आता बाकी आहेत, बारावीचे पेपर चालले आहेत, आणि आता दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत संपूर्ण महत्वाची माहिती मोठी बातमी समोर येत आहे.
निकालाच्या आधारावर पुढील प्रवेश प्रक्रिया ही चालू होते, आणि याचे राज्यातील परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे निकाल देखील लवकर लागणार असल्याची माहिती मिळते. १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
ताज्या अपडेटनुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावी निकाल जाहीर करू शकते. गेल्या वर्षी एसएससी बोर्डाचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. त्या आधी २०१९ साली ०८ जूनला तर २०२० मध्ये २९ जुलैला आणि २०२३ साली हा निकाल ०२ जूनला लागला होता. आता बोर्ड लवकरच निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करणार आहे.
————————————————————————————————-