नवरात्र उत्सव अधिक रंगतदार

0
266
Due to the shortening of the Shraddha period and the coincidence of dates, Navratri will be celebrated for 10 days.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

यावर्षी नवरात्राचा उत्सव विशेष ठरणार आहे. श्राद्धकाळ कमी झाल्यामुळे आणि तिथींच्या संयोगामुळे नवरात्र १० दिवसांचे साजरे होणार असून, हा सर्वांसाठी लाभाचा आणि शुभ मानला जात आहे. भक्तांमध्ये उत्साह असून देवीचे आगमन हत्तीवरून होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हत्तीवर स्वार होऊन देवीचे आगमन झाले तर ते सुख, समृद्धी आणि शुभ फलदायी असल्याचे मानले जाते.

हिंदू पंचांगानुसार नवरात्र वर्षातून चार वेळा येते. त्यापैकी चैत्र आणि आश्विन महिन्यातील नवरात्र प्रमुख मानले जात असून गृहस्थ भक्त मोठ्या श्रद्धेने हे उत्सव साजरे करतात. यावर्षी आश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी २१ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० पासून सुरू होत आहे. सूर्योदय व्यापिनी तिथी नुसार नवरात्राचा प्रारंभ २२ सप्टेंबरपासून होईल. या वेळी अष्टमी पूजा व कन्या पूजन ३० सप्टेंबर रोजी होणार असून महानवमी १ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.

कलश स्थापनेसाठी तीन शुभ मुहूर्त जाहीर करण्यात आले आहेत 

सकाळी ६:०९ ते ८:१५
✅ सकाळी ८:१५ ते १०:३६
✅ अभिजित मुहूर्त – ११:४९ ते १२:३८
नवरात्राच्या काळात दुर्गा सप्तशती, दुर्गा स्तुती आणि दुर्गा चालीसाचे पठण विशेष फलदायी ठरते. या नऊ-दहा दिवसांच्या पूजेमुळे माता दुर्गा धन, धान्य, सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात, असे श्रद्धाळू मानतात. महाराष्ट्रात गावागावांमध्ये भजन, कीर्तन, गरबा, डांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

श्राद्धकाळ कमी आणि नवरात्र वाढल्याने यंदाचा उत्सव अधिक रंगतदार आणि लाभदायी ठरणार असून देवीच्या आगमनाने सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि प्रगतीचा वर्षाव होण्याची श्रद्धा व्यक्त केली जात आहे.

———————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here