spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeमाहिती तंत्रज्ञानMeta AI चे हे नवीन फिचर : तुम्हालाही बनवता येईल परफेक्ट व्हिडिओ

Meta AI चे हे नवीन फिचर : तुम्हालाही बनवता येईल परफेक्ट व्हिडिओ

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

व्हिडिओ एडिटिंग हे क्षेत्र नेहमीच तांत्रिक कौशल्यांची गरज भासवणारे आणि वेळखाऊ मानले जाते. मात्र, आता Meta AI ने या प्रक्रियेत एक क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. कंपनीने आपले नवीन स्मार्ट व्हिडिओ एडिटिंग फिचर सादर केले असून, त्यामुळे अगदी नवशिक्यांनाही प्रोफेशनल दर्जाचे व्हिडिओ तयार करता येणार आहेत, तेही केवळ टेक्स्ट कमांड्सच्या मदतीने.

Meta AI च्या या नव्या फीचरचे नाव आहे प्रॉम्प्ट्स. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते आपला व्हिडिओ अपलोड करतात आणि त्यानंतर ५० हून अधिक तयार असलेल्या प्रॉम्प्ट्स म्हणजेच टेक्स्ट कमांड्स वापरून हव्या त्या बदलांना अंमलात आणू शकतात.

उदा- व्हिडिओतील व्यक्तींच्या कपड्यांमध्ये बदल करणे, बॅकग्राउंडला हटवून नविन दृश्य घालणे, स्टाइलमध्ये विविधता आणणे किंवा संपूर्ण वातावरणच बदलणे हे सर्व केवळ काही सेकंदांत शक्य होते. वापरकर्त्याला कोणतेही विशेष तांत्रिक ज्ञान आवश्यक नाही. फक्त कल्पना करा, टेक्स्ट कमांड टाइप करा आणि काही क्षणांत तुम्हाला पाहिजे असलेला परिणाम तयार होतो !

Meta AI च्या या नव्या तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ एडिटिंग आता केवळ तांत्रिक तज्ञांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठीही सहजसोपे व सुलभ बनले आहे. यामुळे डिजिटल कंटेंट निर्मितीमध्ये एक नवा अध्याय सुरु होण्याची शक्यता आहे.

तंत्रज्ञानाचा चमत्कार

आतापर्यंत व्हिडिओ एडिटिंगसाठी खूप तांत्रिक ज्ञान लागत असे. सॉफ्टवेअर शिकावं लागायचं, बराच वेळ द्यावा लागायचा. पण आता Meta AI च्या नवीन तंत्रज्ञानामुळे हे सगळं बदललं आहे. आता कोणतीही तांत्रिक कौशल्याची गरज नाही. वापरकर्त्याने फक्त हव्या असलेल्या बदलाची सूचना म्हणजे प्रॉम्प्ट टाइप करायची, आणि AI त्या सूचना समजून व्हिडिओमध्ये हवा तसा बदल करतो. अगदी काही मिनिटांत प्रोफेशनल दर्जाचा व्हिडिओ तयार होतो.

सध्या मोफत मिळतंय, पुढे 

सध्या हे फीचर मोफत वापरता येत आहे. मात्र भविष्यात Meta कडून यासाठी पैसे आकारले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही, पण लोकांमध्ये याबद्दल उत्सुकता नक्कीच आहे.

कोणासाठी उपयोगी ?

Meta च्या मते हे नवीन फीचर खास करून क्रिएटर्स, युट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि छोटे व्यावसायिक यांच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. ज्यांना व्हिडिओ कंटेंट तयार करायचा आहे, त्यांच्यासाठी हे काम आता सहज शक्य होणार आहे. यामुळे वेळ वाचेल, खर्च कमी होईल आणि श्रमही कमी लागतील.

Meta च्या तांत्रिक टीम नुसार, “आम्ही नेहमीच AI च्या मदतीने लोकांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे नवीन AI व्हिडिओ एडिटिंग टूल आमच्या त्या प्रयत्नांचा पुढील टप्पा आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती सहजपणे प्रोफेशनल दर्जाचे व्हिडिओ तयार करू शकेल.”

————————————————————————————-

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments