प्रसारमाध्यम : अमोल शिंगे
महाराष्ट्र राज्याचे शालेय मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील शिक्षकांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करून घेण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना किती निधी जाणार याचा आढावा आज आम्ही घेणार आहोत.. या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याची शैक्षणिक परिस्थिती सुद्धा आपल्या समोर येणार आहे..
सध्या महाराष्ट्रात सोलापूर परिसर आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षकांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पहिल्यांदा या निर्णयांतर्गत कोणत्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार जमा करून घेतला जाणार यावर एक नजर टाकू..
कोणत्या शिक्षकांचा पगार जमा होणार
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक
महानगरपालिका शाळांतील शिक्षक
नगर परिषद व नगरपंचायत शाळांतील शिक्षक
राज्य सरकारच्या अनुदानित शाळांतील शिक्षक
कोणत्या शिक्षकांवर लागू नाही ते पाहू..
अनुदानित खासगी शाळांचे शिक्षक
कॉन्ट्रॅक्ट किंवा आउटसोर्स शिक्षक
आता आपण थोडं कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळांची आणि शिक्षकांची संख्या पाहू..
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात १९५८ इतक्या प्राथमिक जिल्हापरिषदेच्या शाळा आहेत..
या शाळांमध्ये ८०९१ इतके शिक्षक कार्यरत आहेत..
या शिक्षकांचा सरासरी एक दिवसाचा पगार हा १३३३ रुपये एवढा असतो..
म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या एक दिवसाच्या पगाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये १ कोटी ७ लाख ८५ हजार ३०३ रुपये एवढा निधी जमा होतो.
आता आपण माध्यमिक शाळांची आणि शिक्षकांची आकडेवारी पाहू..
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हापरिषद शिक्षण विभागच्या ४ माध्यमिक शाळा आहेत.
या ४ माध्यमिक शाळांमध्ये ५३ शिक्षक कार्यरत आहेत.
माध्यमिक शिक्षकांचा एक दिवसाचा पगार हा त्यांच्या दोन वेतन श्रेणीत असतो. या वेतन श्रेणीनुसार एक दिवसाचा सरासरी पगार हा १६५० रुपये असतो..
यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४ शाळांतील ५३ शिक्षकांमधून ८७ हजार ४५० इतका एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणार आहे.
जिल्हापरिषदेच्या ४ माध्यमिक शाळा वगळता इतर १०६१ इतक्या माध्यमिक शाळा कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. यात एकूण १३६३९ इतके शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार देखील सरासरी १६५० च्या आसपास आहे. या हिशोबाने १३६३९ माध्यमिक शिक्षकांचा २ कोटी २५ लाख ४ हजार ३५० रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे.
आता आपण कोल्हापूर शहरातील म्हणजेच महानगरपालिकेच्या शाळा आणि शिक्षकांची आकडेवारी पाहू.
कोल्हापूर शहरात एकूण ५८ महानगरपालिकेच्या शाळा आहेत. या ५८ शाळांमध्ये ४१४ शिक्षक आहेत पण यातील ३३५ शिक्षक कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध आहे. या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार सरासरी १३३३ रुपये एवढा आहे. म्हणजे ३३५ शिक्षकांचा ४ लाख ४६ हजार ५५५ रुपये एवढा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे..
कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि गार पंचायती या शाळाच्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार अंदाजे १५ लाख रुपयापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाऊ शकतो.
आता आपण सर्व शाळांचा एकत्रित हिशोब करू आणि पाहू कि कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा एकूण किती निधी अतिवृष्टी झालेल्या परिसरातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा : १ कोटी ७ लाख ८५ हजार ३०३
जिल्ह्यात जिल्हापरिषद शिक्षण विभागच्या ४ माध्यमिक शाळा : ८७ हजार ४५०
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : २ कोटी २५ लाख ४ हजार ३५०
कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा : ४ लाख ४६ हजार ५५५
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगर पंचायती : १५ लाख
वरील आकडेवारी पाहता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या एक दिवसाच्या पगारामधून आपल्या अतिवृष्टी झालेल्या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून ३ कोटी ५३ लाख २३ हजार ६५८ रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जाणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या पगारातून एक दिवसाचा पगार अतिवृष्टी झालेल्या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून जमा करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच आहे पण याची अंमलबजावणी कशी होणार? यासाठी शिक्षक संघटनांशी विचारविनिमय झाला आहे कि नाही? याचे परिपत्रक कधी काढले जाणार? असे आणखी काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत..