नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात काही वेळात उतरता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता.

0
158
There is a possibility that the Dakshindwara ceremony will take place soon.
Google search engine

कुरुंदवाड : प्रसारमाध्यम न्यूज

गेले दोन -तीन दिवस धरणपाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. कृष्णेचा पूर ओसरु लागल्याने नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात आज सांयकाळी ५ च्या दरम्यान उतरता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे.

याच आठवड्यातील बुधवारी दुपारी १ वाजता चढता दक्षिणद्वार सोहळा झाला होता. धरण पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगेची पाणी पातळी संथ गतीने ओसरत आहे. पाणी ओसरु लागल्याने आज सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान नृसिंहवाडीत उतरता दक्षिणद्वार सोहळा होऊ शकतो.

—————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here