कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्राच्या वातावरणात अचानक बदल व्हायला लागलेत. एका बाजूला होरपळणारं ऊन अन् वाढल्याली उष्णता तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसानं धुमशान घातलंय. अवकाळीसोबत गारपीटीचा इशारा बी दिला आहे. मागच्या २४ तासात विदर्भात अवकाळी पावसाची नोंद झाली होती. तर पाच वेगवेगळ्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत.
महाराष्ट्र हवामान अपडेट :
महाराष्ट्रात अचानक वातावरण बदलले आहे. विदर्भात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, कोकणात तापमान वाढणार आहे. १७-१८ एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कर्नाटकहून महाराष्ट्राच्या दिशेनं कमी दाबाचा पट्टा वर पुढे सरकत असल्याने अवकाळीचा धोका महाराष्ट्रात अजूनही कायम आहे. एप्रिल महिन्यात अवकाळी आणि हिटवेव अशा दोन्ही संकटांना महाराष्ट्राला तोंड द्यावं लागत आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या ३८ ते ४४ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने विशेष अलर्ट दिला आहे. पुढच्या पाच दिवसांत तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. २-३ डिग्री सेल्सियस तापमान वाढ होईल. त्यानंतर तापमानात कोणताही बदल होणार नाही असंही म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री, टोपी घेऊनच घराबाहेर पडावं, नाहीतर उष्माघाताचा धोका जाणवण्याची शक्यता आहे.