The State Election Commission has announced the detailed schedule of the voter list.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. जिल्हा प्रशासनांनी प्राथमिक तयारी सुरू केली असून, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर छाननी करून २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील व्यवस्थित आहेत का, याची पडताळणी करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नसून, फक्त मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, प्रभागात चुकून नाव राहणे किंवा वगळले जाणे यासंदर्भातील दुरुस्त्याच हरकती व सूचनांच्या आधारे करण्यात येतील.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी या निवडणुका होत आहेत. निवडणूक तारखा आयोग लवकरच जाहीर करणार आहे.
जिल्हानिहाय अध्यक्षपदाचे आरक्षण
ठाणे – सर्वसाधारण महिला, पालघर – अनुसूचित जमाती, रायगड – सर्वसाधारण,
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सिंधुदुर्ग – सर्वसाधारण,
नाशिक – सर्वसाधारण, धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), नंदुरबार – अनुसूचित जमाती,
जळगाव – सर्वसाधारण, सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला), पुणे – सर्वसाधारण, सांगली – सर्वसाधारण महिला,
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), कोल्हापूर – सर्वसाधारण महिला,
छ. संभाजीनगर – सर्वसाधारण, जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),