कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे संभाव्य महापुराचा धोका तूर्त तरी टळलाआहे. आज कालच्या पेक्षा हवामान स्वच्छआहे. सकाळी अकरा नंतर ऊन पडले आहे. मात्र धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने कोल्हापुरात पंचगंगेचे पाणी संथ गतीने वाढत आहे. राधानगरी धरणाची तीन दरवाजे बंद असून चार दरवाजे सुरु आहेत. यातून एकूण ४३५६ क्यू सेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. बावडा-शिये रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे कोल्हापुरातून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्त्यावर पाणी आल्याने रत्नागिरीला जाणारा रस्ताही बंद ठेवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांवर पावसाचा मारा सुरूच राहणार आहे. ज्यामुळं या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आकाश ढगाळ राहणार असून तुलनेनं पावसाची तीव्रता मात्र कमी असणार आहे असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील २४ तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांना पावसानं चांगलंच झोडपलं. दोन दिवसांच्या तूफान बॅटिंगनंतर आता मुंबई शहर आणि उपनगरांमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही काळ्या ढगांनी मात्रा शहराची पाठ सोडलेली नाही. ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडमध्येसुद्धा हेच चित्र पाहायला मिळत असून, पुढच्या २४ तासांमध्ये रेड अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काही अंशी मंदावल्याचं चित्र पाहायला मिळेल. अगदीच लख्ख सूर्यप्रकाश नसला तरीसुद्धा हा पाऊस मात्र विश्रांती घेताना दिसेल.
पुढील २४ तासांमध्ये उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण कोकणातील जिल्ह्यांवरही पावसाचा मारा पाहायला मिळणार असून गोव्यापर्यंत ही स्थिती पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा मारा असेल. यादरम्यान कोकण किनारपट्टी क्षेत्रावर वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी इतका असेल, ज्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांवर पावसाचा मारा सुरूच राहणार आहे. ज्यामुळं या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आकाश ढगाळ राहणार असून तुलनेनं पावसाची तीव्रता मात्र कमी असणार आहे असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
_______________________________________________________________________