कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांमुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामीनदाराबाबतच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर महामंडळांना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे.