परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : मंत्री ॲड.आशिष शेलार

शाहू महाराजांना अभिवादन : जन्मस्थळाची पाहणी..

0
96
On the occasion of the 151st birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, the state's Cultural Affairs Minister Adv. Ashish Shelar visited his birthplace at Lakshmi Vilas Palace and paid tribute to him.
Google search engine

कोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथील त्यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी सोबत आमदार अमल महाडिक, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुरातत्व विभागाचे उदय सुर्वे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, पुराभिलेख सहसंचालक दिपाली पाटील उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शाहू जन्मस्थळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या ठिकाणी असणाऱ्या समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन परिपूर्ण अशा शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच घेऊ अशी ग्वाही दिली. तसेच आवश्यक निधीही कमी पडणार नाही असे सांगितले.

भेटीदरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी शाहू जन्मस्थळ येथील छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली तसेच परिसरातील सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. शाहू जयंतीदिनी सुरू झालेल्या होलोग्रफिक शोच्या ठिकाणी थिएटरची पाहणी करून शाहू महाराजांवरील लघुपट व होलोग्रफिक शो पाहिला. भेटीत लक्ष्मी विलास पॅलेस मधील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी शाहू महाराजांचा इतिहासही जाणून घेतला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here