प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
बहरीनचा टप्पा (१९३२)
इराणमध्ये तेल सापडल्यानंतरही तज्ज्ञांना वाटत होते की अरबी द्विपकल्पात (Arabian Peninsula) तेल नसेल. पण १९३२ मध्ये बहरीनमध्ये तेल सापडले आणि संपूर्ण जगाचे लक्ष या वाळवंटाकडे वळले.हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.
बहरीन हा देश सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडण्यात आलेला आहे. कतार बहरीन कॉजवे ह्या ४० किमी लांबीच्या सागरी पुलाने बहारीन व कतार हे देश भविष्यात जोडले जातील.बहरैन हा देश ८८बेटे मिळून बनला आहे

बहरीनमध्ये तेल सापडल्यामुळे सौदी अरेबियातही तेल असण्याची शक्यता बळावली.
सौदी अरेबिया ‘दम्माम नंबर ७’ चा चमत्कार (१९३८)
सौदी अरेबियाचा इतिहास बदलणारी सर्वात मोठी घटना १९३८ मध्ये घडली.
अमेरिकन कंपनी ‘कॅलिफोर्निया स्टँडर्ड ऑईल’ (Socal) चे भूगर्भशास्त्रज्ञ मॅक्स स्टाइनके (Max Steineke) हे सौदीच्या वाळवंटात अनेक वर्षांपासून विहिरी खोदत होते.
पहिल्या ६ विहिरींमध्ये काहीच सापडले नाही. कंपनीने काम थांबवण्याचे आदेश दिले होते, पण मॅक्स यांनी एक शेवटचा प्रयत्न करायचे ठरवले.

४ मार्च १९३८ रोजी ‘दम्माम नंबर ७’ या विहिरीतून तेलाची मोठी धार उसळली. या एका विहिरीने सौदी अरेबियाला जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले.
कुवेत आणि अमिरातीमधील शोध (१९३०-१९६०)
कुवेत (१९३८):कुवेतमध्ये तेलाचा शोध १९३० च्या दशकात लागला. १९३८ मध्ये पहिला मोठा तेल साठा बर्गन क्षेत्रात सापडला, ज्यामुळे कुवेतची अर्थव्यवस्था बदलण्यास सुरुवात झाली ‘बुरगन’ (Burgan) क्षेत्रात जगातील दुसरा सर्वात मोठा तेलाचा साठा सापडला.१९९० मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले. १९९१ मध्ये माघार घेताना इराकी सैन्याने ६०० पेक्षा जास्त तेल विहिरींना आग लावली. या तेलाच्या आगी विझवण्यासाठी अनेक महिने लागले आणि हे कुवेतच्या इतिहासातील एक भयानक आणि विध्वंसक क्षण होता, ज्यामुळे तेलाच्या धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरले होते.युद्धा नंतर, कुवेतने आपले तेल उत्पादन पुन्हा सुरू केले आणि KOC आणि KPC च्या माध्यमातून जागतिक स्तरावर तेल पुरवठा सुरू ठेवला. २००५ मध्ये नवीन उच्च दर्जाच्या तेलाचा शोध लागला, जो कंपनीच्या क्षमतेसाठी महत्त्वाचा ठरला

संयुक्त अरब अमिराती (१९५८-१९६०): अबु धाबीमध्ये समुद्रात आणि जमिनीवर तेलाचे मोठे साठे सापडले, ज्यामुळे दुबई आणि अबु धाबीचा चेहरामोहरा बदलला.१९३० च्या दशकात यूएईची अर्थव्यवस्था प्रामुख्याने मोती काढण्यावर अवलंबून होती. परंतु, जपानी कृत्रिम मोती बाजारात आल्यामुळे ही अर्थव्यवस्था धोक्यात आली. त्यानंतर १९३० च्या दशकात तेल शोधण्यासाठी परदेशी कंपन्यांना परवाने देण्यात आलेअनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर, १९५८ मध्ये अबू धाबी मधील ‘उम शैफ’ (Umm Shaif) या सागरी क्षेत्रात पहिल्यांदा तेल सापडले.

त्यानंतर १९६० मध्ये जमिनीवर ‘बाब’ (Bab) या ठिकाणी तेलाचा साठा सापडलाअबू धाबीने १९६२ मध्ये पहिल्यांदा कच्च्या तेलाची निर्यात सुरू केली [१]. यानंतर १९६६ मध्ये दुबईमध्ये ‘फतेह’ (Fateh) तेल क्षेत्रात साठा सापडला आणि १९६९ पासून दुबईनेही तेल निर्यात सुरू केली

आज यूएई जगातील १० प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. त्यांच्याकडे जगातील एकूण तेलाच्या साठ्यापैकी सुमारे ६% साठा आहे सध्या यूएई आपली अर्थव्यवस्था केवळ तेलावर अवलंबून न ठेवता पर्यटन, तंत्रज्ञान आणि व्यापार या क्षेत्रांतही प्रगती करत आहे
पुढच्या चाप्टर ३ मध्ये पाहू तेलाचा शोध लागण्याची शास्त्रीय प्रक्रिया आणि तेलाचे राजकारण…….





