गोष्ट २१ लाख रुपये डझन फळांच्या सम्राटाची

0
519
Google search engine

 

महाराष्ट्रातील मातीचे प्रकार आणि त्या मातीत येणाऱ्या आंब्यांची चव, रंग, गंध यामधील बदल हे अतिशय रोचक विषय आहेत. महाराष्ट्रातील मातीचा प्रमुख पहिला प्रकार जो आहे तो काळी माती (Regur Soil / Black Cotton Soil) असे म्हणतात. अश्या प्रकारची माती विदर्भ, मराठवाडा,खानदेश या भागात  सापडते ही माती खनिजांनी समृद्ध, जलधारण क्षमता जास्त. या भागात स्थानिक जातीतले आंबे येतात ‘कापरी’, ‘तोतापुरी’, ‘राजापुरी’ वगैरे त्यांची चव थोडी तुरट किंवा आंबटसर मिठास,रंग गडद पिवळसर किंवा हिरवटसर,गंध सौम्य, फारसा गोडसर नसतो, मातीचा दुसरा प्रकार म्हणजे लाल माती (Laterite Soil) ही महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम घाट, काही ठिकाणी सातारा, पुणे परिसर या भागामध्ये सापडते. या मातीत लोखंड-ऑक्साईड जास्त असते व  पाण्याचा निचरा चांगला, थोडी उष्ण असते मातीच्या चांगल्या गुणधर्मा मुळे  उत्तम प्रतीचा म्हणजे प्रीमियम दर्जेचा आंबा येतो. हापूस/अल्फान्सो, पायरी, रायवळ, मंजरिया – हे सगळे आंबे याच मातीत येतात. चव अत्यंत गोड, मऊसर, तोंडात विरघळणारी रंग तर आकर्षक केशरी-पिवळा या आंब्यांचा गंध अत्यंत सुगंधी, गोडसर, मनमोहक. मातीचा तिसरा प्रकार जो आहे तो वालुकामय माती (Sandy Soil) ही माती नदीकिनाऱ्याचे भाग, जसे की गोदावरी, भीमा, कृष्णा परिसर येथे सापडते. पाणी झपाट्याने झिरपते, उष्णता जास्त, पोषणतत्त्व कमी या मातीत स्थानिक प्रकारचे आंबे – लवकर पिकणारे, पण टिकाऊ नसलेले आंबे पिकतात. चवीला पांचट व कधी गोडसर त्यांचा रंग फिकट पिवळा व  गंध सौम्य किंवा फारसा विशेष नसलेला. महाराष्ट्रातील मातीचा चौथा प्रकार गडद तपकिरी माती (Alluvial/Clayey Loam) ही माती नाशिक, नगर, कोल्हापूर भागात काही ठिकाणी सापडते. अतिशय सुपीक, पण जड, ओलसर माती असते यात ‘तोतापुरी’, ‘नेल्यम’, ‘बदामी’ असे विविध संकरित प्रकार पिकतात चवीला थोड संतुलित (गोड आणि तुरट) रंग हा पिवळसर किंवा केशरी गंध मध्यम सुगंधी, पण हापूससारखा टोकाचा नाही.

 

 

 

मातीचा आंब्याच्या चव-गंधावर परिणाम कसा होतो?

१. खनिज घटक (minerals):

फॉस्फरस, पोटॅश, लोह, झिंक इ. चा प्रभाव फळाच्या गोडव्यावर व गंधावर होतो

२. जलधारण क्षमता:

मातीतील आर्द्रता जितकी योग्य, तितका आंबा रसाळ आणि गोड होतो

३. तापमान आणि हवामान:

लाल माती असलेल्या कोकणात हवामान उष्ण आणि दमट, त्यामुळे आंबा अधिक सुगंधी व रसरशीत

आपल्या महाराष्ट्रातील जिल्हयानुसार पिकणारा आंबा व जिल्ह्यातील माती हवामान पाणी यांचा होणार परिणाम ही आपण पाहू.

“हापूस (अल्फोन्सो)” हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड या भागात पिकतो. या जिल्ह्यात लाल सच्छिद्र मुरमाड माती सापडते. येथील हवामान समुद्र जवळ असल्यामुळे उष्ण व दमट आहे. दिवसा गरम व रात्री दमट हवामाना मुळे अतिशय गोड,तोंडात विरघळणारा रसाळ आंबा बनतो. सुगंध इतका टोकाचा की हाता मध्ये घेतल्यावर पटकन ओळखू येतो. हा प्रीमियम दर्जेचा व सर्वाधिक किंमतीचा आंबा आहे.

“पायरी”, “रायवळ” हे  रायगड, पालघर या जिल्ह्यात पिकतो या जिल्ह्यातील माती ही लाल व थोडी वालुकामय आहे. पायरी हा लवकर येणारा आंबा खूप रसाळ, पण थोडा आंबटसर गोड असतो. रायवळ हा  चवदार पण टिकाऊ नसतो.

“तोतापुरी”, “लंगडा” ही आंब्याची जात नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यात पिकते. इथे काळसर गडद माती असल्यामुळे इथे पिकणारे आंबे हे चवीला गोडसर-तुरट आणि हा आंबा टिकाऊ पण फारसा सुगंधी नाही.

“केसर”, “बदामी” या जातीचे आंबे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात पिकतात. इथली माती गडद काळसर व थोडी चिकणमाती मिश्रण अश्या प्रकारची आहे. केसर हा थोडा हापूससारखा रंग असणार आंबा आहे, पण सुगंध कमी असतो.बदामी हा आंबा बेंगलोर कडचा प्रभाव असलेला असा आंबा आहे. औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात  “कापरी”, “दशहरी” हा आंबा पिकतो. काळी माती मध्ये हा येतो.चव सौम्य असून टिकाऊ पण निर्यातीसाठी नाही फक्त स्थानिक बाजारपेठेत देवघेव होते.

सगळ्यांचा बापुस  हापुसचं का ?

आता होते, आपल्या हिरोची एंट्री ‘हापूस’ जसे चांगले व्यक्तिमत्व घडण्यासाठी संस्कार महत्वाचे असतात. अगदी तसेच या हापूस वर कोकणातील लाल माती आपले विशेष संस्कार आईच्या माये सारखी करते. लोह मँगनीज हे सूक्ष्म पोषक द्रव म्हणून हापूस च्या वाढीस कारणीभूत ठरतात. हापूस आंब्याला मिळणारी खास केशरी रंगछटा आणि सुगंध यामागे जमिनीतील खनिज (लोह, मॅंगनीज) कारणीभूत आहेत.  जांभा खडकातील सच्छिद्रता यामुळे पाण्याचे निस्सारन जलद घडते. तसेच झाडाची मुळे मुक्तपणे श्वास घेतात.  झाडात गोडी, सुगंध निर्माण करणारे तेलकट घटक अधिक प्रमाणात तयार होतात. कोकणातील समुद्रावरून वाहणारे वारे दिवसा गरम आणि रात्रीच्या दमट हवेमुळे रस अधिक प्रमाणात तयार होतो. ह्याचा थेट परिणाम गोडी व सुगंधावर ही होतो. तसेच हापूस झाडे पुन्हा संकरित न केल्याने त्याच्या चव, गंध आणि रसात सातत्य टिकून आहे. बहुतेक वेळा ही झाडं नैसर्गिक पद्धतीने वाढवलेली असतात त्यामुळे आंब्याची गंधकणं (Aroma Compounds) फार उंच प्रतीची असतात. पारंपरिक बागायती व पिढ्यानपिढ्या जतन केलेली जात.म्हणून आज ही कोकणातील प्रीमियम दर्जेचा हापूस शो स्टॉपर आहे. तस म्हणल तर पोर्तुगीजानी एक काम चांगल केलयं ह्यो हापूस आंबा भारतात आणून आवो व्हय खरचं की हापूस आंबा  म्हणजे त्यांच्या भाषेत (अल्फोन्सो) हा त्यांचीच देन हाय. आता बघा १५व्या-१६व्या शतकात पोर्तुगीज लोक भारतात आले, विशेषतः गोवा आणि कोकण किनारपट्टीवर त्यांनी वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी अनेक पाश्चिमात्य शेतीतंत्र आणि फळांचे प्रकार भारतात आणले, तसेच स्थानिक फळांची लागवड सुधारण्याचे तंत्रज्ञानही दिले.

“हापूस” आंब्याला आपण “अल्फोन्सो” म्हणतो. हे नाव पोर्तुगीज सरदार अफोंसो द आल्बुकर्क (Afonso de Albuquerque) यांच्या नावावरून पडले आहे. पोर्तुगीजांनी आंब्याच्या स्थानिक प्रजातींच्या संकरातून अधिक गोड, स्वादिष्ट आणि टिकाऊ प्रजाती विकसित केल्या. हापूस आंबा म्हणजे त्या काळात झालेल्या संकरणाचे फळ, ज्यामुळे त्याला विशेष सुवास, गोडसर चव आणि लोण्यासारखा पोत मिळाला. हापूस आंब्याचे मुख्य उत्पादन महाराष्ट्रातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, आणि कोकण भागात होते, जे पोर्तुगीज प्रभावाखाली होते.

हा फोटो पोर्तुगीज सरदार अफोंसो द आल्बुकर्क (Afonso de Albuquerque) यांचा आहे.

———- दिग्विजय रा.माळकर

 

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here