कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले साताऱ्यातील कास पठार सध्या पांढऱ्या फुलांनी बहरले आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात कास पठार विविध रंगांच्या फुलांनी आणि विशेषतः पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजलेले असते.
कास पठार साताऱ्याजवळ आहे. या पठारावर एरवी कधी वनस्पती उगवत नाही मात्र पावसाळा सुरु झाला कि वनस्पती अस्तित्व दाखविते. दोन अडीच महिन्यात पठारावर झुडूपवर्गीय वनस्पती तरारतात. त्याना ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन महिन्यातच आकर्षक फुले येतात. येथे विविध प्रकारची रानफुले पाहायला मिळतात, ज्यात पांढऱ्या रंगाची फुले मोठ्या प्रमाणावर आहेत. कास पठार हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.
कास पठार साताऱ्यापासून पक्त २३ किलोमीटरवर आहे. साताऱ्याला जाण्यासाठी बस व रेल्वेची सोय आहे. या पठारावर पांढऱ्यारंगाची रानोळी फुले असतात. पावसाळ्याच्या दिवसात, या फुलांना वाढायला योग्य वातावरण मिळतं, ज्यामुळे ते अधिक सुंदर दिसतात. कास पठाराजवळच ठोसेघर धबधबा आहे. हा धबधबा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हा धबधबा पहायलाही गर्दी होते.