पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी देशातील पहिली संस्था : प्रतिबिंब प्रतिष्ठान

ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रोत्साहन- मदतीने उपक्रम सुरु

0
150
Raja Mane, president of the Digital Media Editors Journalists Association, appealed to needy journalists in the state to apply online.
Google search engine

गरजू पत्रकारांनी अर्ज करावा : संस्थापक राजा माने यांचे आवाहन

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असलेल्या राजा माने यांनी राज्यातील गरजू पत्रकारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसेच मुला-मुलीच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करु! “, असा शब्द राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिला होता. त्या शब्दास अनुसरुन प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिले.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे आदी उपस्थित होते. खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअँप द्वारे ८६६८३४३०२४ या नंबरवर पाठवावा.
शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी अर्ज 
प्रतिबिंब प्रतिष्ठान ( डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक मदतीसाठी )
https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9
——————————–
खेळ / क्रीडा सहाय्यासाठी अर्ज –  (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या खेळ / क्रीडा सहाय्यासाठी )
https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9
———————-
वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा अर्ज –  (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारासाठी )
https://forms.gle/rDK8kiLWGZhQfQ5Y6

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here