
कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
‘रोजा’ आणि ‘फूल और कांटे’ सिनेमाद्वारे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मधु तुम्हाला माहितीच असेल. दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘रोजा’ सिनेमामध्ये तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली होती. याच मधुची मुलगी लवकर बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे.
अभिनेत्री मधुने साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘रोजा’ सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. मधुने आता वयाची पन्नाशी ओलांडलीय. पण अभिनेत्री म्हणून ती आजही सिनेमांमध्ये काम करते. स्वतःचे करिअर यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करून सिनेसृष्टीला अलविदा म्हटले होते. मनासारख्या भूमिका मिळत नसल्याने विश्रांती घेणे योग्य वाटले, असा खुलासाही तिने कालांतराने केला होता. मधुने तमिळ भाषिक सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं होते आणि आजही साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतेय.
मधु ही हेमा मालिनी यांची भाची आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे. स्वतःच्या मुलींसोबतचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मधुने तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये जुळ्या मुलींचा फोटो शेअर केलाय. तिच्या दोन्ही मुली हीरोइनप्रमाणेच सुंदर आहेत. लेटेस्ट फोटोमध्ये मायलेकीने लेहंगा परिधान केल्याचे दिसतंय. दोघींचाही लुक प्रचंड सुंदर दिसतोय. फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.
मधु सध्या काय करते?
मधु नात्यामध्ये जुही चावलाची भावजय लागते. जुही आणि मधुचे पती एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. हिंदी सिनेमातील ड्रीम गर्ल हेमा मालिनी मधुची आत्या आहे. कामासंदर्भात सांगायचे झाल्यास विजय राज आणि श्रेयस तळपदे स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा ‘कर्तम भुगतम’ (२०२४) मध्ये मधु झळकली होती. २०२५ मध्ये ती विष्णु मंचू, अक्षय कुमार आणि प्रभासचा सिनेमा ‘कन्नपा’मध्येही दिसणार आहे. ‘दिलजले’, ‘नीलगिरी’, ‘जेंटलमॅन’ आणि ‘एलान’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांमध्येही मधुने काम केलंय.



