नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशातील भाविकांसाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी आता विशेष रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. ही सेवा IRCTC अंतर्गत दिली जाणार असून, ‘भारत गौरव’ नावाची विशेष ट्रेन प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सोय देणार आहे.
यात्रेचा मार्ग आणि ठिकाणे :
ही विशेष ट्रेन ऋषिकेश येथून निघणार आहे आणि हरिद्वार, मुरादाबाद, बरेल, शाहजहांपूर, हरदोई, लखनऊ, कानपूर, ओरई, झाशी, ललितपूर या ठिकाणी थांबणार आहे. या ठिकाणांवरील प्रवाशा पुढील प्रवासासाठी ट्रेनमध्ये सामील होऊ शकतात.
ज्योतिर्लिंग दर्शन :
यात्रेअंतर्गत प्रवाशांना उज्जैनमधील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर, सोमनाथ, नागेश्वर, द्वारकाधीश आणि गुजरातमधील द्वारका, त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर, नाशिकमधील भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगरमधील घृणेश्वर यांचे दर्शन घेता येईल. प्रत्येक ठिकाणी ट्रेन थांबणार आहे आणि प्रवाशांना आरामदायी दर्शनाची सोय मिळणार आहे.
या ट्रेनमध्ये एकूण ७६७ बेड्स उपलब्ध आहेत. प्रवाशांसाठी 2AC, 3AC आणि स्लीपर क्लासची राहण्याची सोय आहे. प्रवासा दरम्यान नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाणार आहे. तसेच स्थानिक पर्यटन स्थळांची भेट देण्यासाठी बसची सोय आणि हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
ट्रीपचे भाडे :
-
स्लीपर कोच : प्रति व्यक्ती २४,१०० रुपये ; मुलांसाठी ( ५–११ वर्षे ) २२,७२० रुपये
-
3AC : प्रति व्यक्ती ४०,८९० रुपये ; मुलांसाठी ३९,२६० रुपये
-
कम्फर्ट क्लास 2AC : प्रति व्यक्ती ५४,३९० रुपये ; मुलांसाठी ५२,४२५ रुपये