कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कर्मचारी निवड आयोग (SSC) ने २०२५ -२६ या वर्षासाठीची नवी परीक्षा दिनदर्शिका जाहीर केली आहे. या दिनदर्शिकेत केंद्र सरकारच्या विविध विभागांतील भरतीसाठी होणाऱ्या प्रमुख परीक्षांच्या अधिसूचना, अर्ज करण्याच्या अंतिम तारखा आणि परीक्षा घेण्याच्या संभाव्य तारखा यांचा समावेश आहे. ही माहिती SSC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
SSC मार्फत दरवर्षी देशभरातील केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया पार पडते. SSC CGL, CHSL, MTS, स्टेनोग्राफर, JE, GD कॉन्स्टेबल, दिल्ली पोलीस भरती अशा प्रमुख परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे वेळापत्रक अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्यानुसार आपली रणनीती आखता येणार आहे. यंदाच्या वेळापत्रकातही अनेक महत्वाच्या परीक्षा, अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखा, अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि परीक्षा घेण्याच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत.
SSC परीक्षांचे महत्त्वाचे वेळापत्रक (२०२५) :
परीक्षा | अधिसूचना तारीख | अंतिम मुदत | परीक्षा तारीख |
---|---|---|---|
Selection Post Phase-XIII, 2025 | 2 जून 2025 | 23 जून 2025 | 24 जुलै – 4 ऑगस्ट 2025 |
Stenographer Grade ‘C’ & ‘D’ Exam, 2025 | 5 जून 2025 | 26 जून 2025 | 6 – 11 ऑगस्ट 2025 |
Hindi Translators Exam, 2025 | 5 जून 2025 | 26 जून 2025 | 12 ऑगस्ट 2025 |
CGL Exam, 2025 | 9 जून 2025 | 4 जुलै 2025 | 13 – 30 ऑगस्ट 2025 |
Delhi Police SI & CAPFs Exam, 2025 | 16 जून 2025 | 7 जुलै 2025 | 1 – 6 सप्टेंबर 2025 |
CHSL Exam, 2025 | 23 जून 2025 | 18 जुलै 2025 | 8 – 18 सप्टेंबर 2025 |
MTS & Havaldar Exam, 2025 | 26 जून 2025 | 24 जुलै 2025 | 20 सप्टेंबर – 24 ऑक्टोबर 2025 |
Junior Engineer Exam, 2025 | 30 जून 2025 | 21 जुलै 2025 | 27 – 31 ऑक्टोबर 2025 |
Delhi Police Constable Exams | जुलै – सप्टेंबर 2025 | जुलै – सप्टेंबर 2025 | नोव्हेंबर – डिसेंबर 2025 |
Constable (GD) in CAPFs, NIA, SSF & Rifleman (Assam Rifles) | ऑक्टोबर 2025 | नोव्हेंबर 2025 | जानेवारी – फेब्रुवारी 2026 |
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) :
- JSA/LDC, SSA/UDC, ASO – परीक्षा 8 जून 2025 रोजी
- पुढील फेरी जानेवारी 2026 मध्ये होणार असून परीक्षा मार्च 2026 मध्ये होतील.
उमेदवारांसाठी सूचना :
या सर्व परीक्षा संगणक आधारित (Computer-Based Examination – CBE) पद्धतीने घेतल्या जातील. अर्ज प्रक्रिया, प्रवेशपत्रे आणि इतर संबंधित माहिती SSC च्या अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल.
तयारीसाठी महत्त्वाचे –
-
अर्ज करण्याच्या अंतिम तारखा लक्षात ठेवा : प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. उमेदवारांनी या तारखा लक्षात घेऊन वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
-
परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम समजून घ्या : प्रत्येक परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रम वेगळा असतो. त्यामुळे तयारी करताना संबंधित माहितीचा अभ्यास करा.
-
अभ्यासाचे नियोजन करा : उमेदवारांनी आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करून नियमित सराव करणे आवश्यक आहे.
-
अधिकृत वेबसाइटवर नियमित भेट द्या : SSC च्या अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी नवीन अपडेट्स आणि सूचना प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे नियमितपणे वेबसाइट तपासणे उपयुक्त ठरेल.
SSC च्या या नव्या परीक्षा दिनदर्शिकेमुळे उमेदवारांना त्यांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करता येईल. सरकारी नोकरीच्या संधी शोधणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
उमेदवारांनी ही दिनदर्शिका लक्षात ठेवून आपल्या अभ्यासाचा कालावधी ठरवावा. तसेच, SSC ची अधिकृत वेबसाइट (https://ssc.nic.in) नियमित तपासत राहणे आणि अधिसूचना आल्यानंतर वेळेत अर्ज भरणे आवश्यक आहे. ही दिनदर्शिका तात्पुरती असून, SSC कडून वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत अद्ययावत माहितीसाठी वेबसाइटवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.
——————————————————————————————