पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
जून महिन्यामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडते पण यावर्षी प्रथमच खंडित झाली असून मे महिन्यातच वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
या वर्षी प्रथमच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी झाले आहे. चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदीच्या पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी, नाले, ओढ्यांना पाणी येऊन दुथडी भरून वाहू लागले आहेत.
जून महिन्यामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडण्याची परंपरा यावेळी प्रथमच खंडित झाली आहे. वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होतं आहे. त्यामुळे पाणी पात्राबाहेर पडले आहे. मे महिन्यातच वारणा नदी पात्राबाहेर येण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली आहे. वारणा धरण क्षेत्रात २१ मे ते २७ मे पर्यंत २३९ मिलिमीटर पाऊस झाला. सोमवारी सकाळ पर्यंतच्या २४ तासात धरण क्षेत्रात ५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. चांदोली धरणात एकूण ३४ टीएमसी पाणीसाठा असल्याचे वारणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मिलींद किटवाडकर यांनी सांगितले.