भारत पाकिस्तान यांच्यात वाढला तणाव : मेहबूबा मुफ्ती झाल्या भावुक..

0
166
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांना त्वरित चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान अर्थपूर्ण संवाद साधत नाहीत तोपर्यंत काश्मीरमधील परिस्थिती बिघडतच जाईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

“भारत एक उगम पावणारी शक्ती आहे आणि पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या मागे पडत चालला आहे. दोन्ही देशांनी स्वतःला विनाशाच्या दिशेने ढकलणं थांबवायला हवं. जम्मू-कश्मीरमधील लोक, विशेषतः सीमावर्ती भागातील लोक दररोज संघर्ष करत आहेत.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली., “आपल्या मातांना अजून किती काळ यातना सहन कराव्या लागणार?” असा प्रश्न उपस्थित करून त्या भावूक झाल्या. “आतंकी तळ नष्ट करण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे आणि आता हे युद्ध थांबले पाहिजे”, असेही त्या म्हणाल्या.

अणुयुद्धाच्या परिणामांची भिती ..

“माध्यमं खोटी गोष्ट का पसरवत आहेत? प्रचारालाही एक मर्यादा असते आणि दोन्ही बाजूंनी मीडिया नकारात्मक भूमिका बजावत आहे. आपण पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि दोन्ही देशांकडे अणुशक्ती आहे. मला भीती वाटते की हे युद्ध जर अणुयुद्धात बदलले, तर काहीच उरणार नाही. केवळ निरपराध लोकच मारले जातील.” अशी भिती यांनी यावेळी व्यक्त केली.

हल्ल्यांमुळे परिस्थिती बिघडली..

“लोकांनी दाखवून दिलं की पहलगाम हल्ल्याने आपल्याला किती खोलवर परिणाम केला होता, पण आता या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युद्ध कधीच कोणतंही समाधान नसतं आणि आता राजकीय तोडग्याचा काळ आला आहे”, असेही महबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here