परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना अधिक माहिती http://www.mscepune.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
‘परीक्षा परिषदेने २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी या यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. या अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर संपादणूक रद्द करण्यात येईल,’ असेही ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.