कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाच्या वाढीव भूसंपादनामुळे विमानतळ सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विकासवाडी-नेर्ली-तामगांव-उजळाईवाडी-विमानतळमार्गे -मुडशिंगी-वसगडे-लांबोरे मळा ते राज्यमार्ग क्र. ११७ ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ९४ (भाग- तामगाव ते उजळाईवाडी) हा विमानतळाच्या भूसंपादनामुळे बाधीत होत आहे. त्यामुळे तामगांव ते उजळाईवाडी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
या रस्त्यामुळे विमान वाहतुकीसाठी तांत्रिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत असल्याबाबत तसेच विमानतळ प्राधिकरणास नेव्हिगेशन अँड इन्स्ट्रुमेंट लँडींग सिस्टम तसेच अन्य उपकरणे बसविण्यासाठी हा रस्ता तात्काळ बंद करणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे. सद्यस्थितीत सुरु असलेला तामगाव उजळाईवाडी विमानतळ रस्ता ते शाहू नाका येथे येण्यासाठी अंदाजे पाच कि. मी. इतके अंतर होते तर हा रस्ता बंद करुन तामगाव नेर्ली गोकुळ शिरगाव एमआयडीसी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ते शाहू नाका येथे पर्यंत येण्यासाठी अंदाजे ७ कि.मी. अंतर कापावे लागते. तसेच विमान वाहतुक व सध्याची युध्दजन्य परिस्थिती बघता सदरचा रस्ता तात्काळ बंद करणे आवश्यक असल्याने १० मे राेजी रात्री १२ वाजल्यापासून वाहतूक बंद चा निर्णय घेण्यात आला आहे.
सदरची बाब ही विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. तसेच सध्या युध्दजन्य परिस्थिती असलेने कोल्हापूर विमानतळास हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच सर्व विभागाकडून विमानतळ सुरक्षे बाबत दक्षता घेणेत येत आहे. परंतु नेर्ली तामगांव हा रहदारीचा रस्ता कोल्हापूर विमानतळ रनवे लगतच असल्याने विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, तरी नेर्ली तामगांव रस्ता विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ बंद करण्यात आला आहे.
जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावणेत यावी. या उपाययोजना पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर व प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबत एकत्रितपणे कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
————————————————————————————————-