राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा दिनकर पोवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अडीच वर्षांपूर्वी सोन्याची शिरोली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. मावळते उपसरपंच प्रकाश चौगले यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होत.
सरपंच अश्विनी गुरुनाथ चौगले यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी ग्रामपंचायत सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. या सभेत सुवर्णा दिनकर पोवार यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाली. सभावृत्तांत वाचन ग्रामविकास अधिकारी दिलीप कदम यांनी केलं.
सोन्याची शिरोली गावामध्ये चार राजकीय गट कार्यरत आहेत.गटप्रमुख हरिआबा चौगले,नंदकुमार पाटील,गोविंद चौगले,प्रकाश डेळेकर यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या समझोत्यातुन ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
आजच्या उपसरपंच निवड सभेत गटप्रमुख गोविंद चौगले,नंदकुमार पाटील,दिनकर पोवार,मावळते उपसरपंच प्रकाश चौगले यांनी गावाच्या विकासाचा आढावा घेतला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ पाटील,सागर चौगले,दीपाली संतोष गुरव,वैशाली चंद्रकांत चौगले,शांताबाई पांडुरंग चौगले,सीमा भरत चौगले,लक्ष्मी बापू कांबळे,गुरुनाथ चौगले,विठ्ठल चौगले,बाबुराव चौगले,विलास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.