नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेत, अवघ्या २४ तासांत तीन महत्त्वाच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने संरक्षण क्षमतेत वेगाने वाढ केली असून, १६ आणि १७ जुलै रोजी घेतलेल्या या चाचण्यांनी भारताची तांत्रिक ताकद पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केली आहे.
‘आकाश प्राइम’ चे यश भारताची हवाई ढाल अधिक भक्कम
भारताच्या डीआरडीओने विकसित केलेल्या ‘आकाश प्राइम’ या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी लडाखमध्ये १५,००० फूट उंचीवर यशस्वीरित्या पार पडली. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स विंगचे वरिष्ठ अधिकारी या चाचणीवेळी उपस्थित होते.
-
‘आकाश प्राइम’ ही सिस्टीम पूर्णपणे स्वदेशी असून ती पूर्वीच्या ‘आकाश’ सिस्टीमचे अपग्रेडेड व्हर्जन आहे.
-
ऑपरेशन सिंदूरमध्ये चीन व तुर्कीच्या ड्रोन हल्ल्यांना तोंड देताना ‘आकाश’ने केलेल्या कामगिरीवर आधारित सुधारणा यात करण्यात आल्या आहेत.
-
लष्कराच्या तिसऱ्या आणि चौथ्या आकाश रेजिमेंटमध्ये ही सिस्टीम समाविष्ट केली जाणार आहे.
-
यामुळे भारताची हवाई सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे.
-
‘अग्नी-१’ क्षेपणास्त्राची अचूक ताकद
‘अग्नी-1’ या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशातील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) वरून घेण्यात आली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या देखरेखीखाली पार पडली.
-
‘अग्नी-१’ क्षेपणास्त्र १२०० किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदू शकते.
-
त्याचा वेग तब्बल ९००० किलोमीटर प्रति तास आहे.
-
हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वहन करण्यास सक्षम आहे.
‘पृथ्वी-2’ ची अचूकता सिद्ध
‘अग्नी-१’ सोबतच ‘पृथ्वी-२’ या क्षेपणास्त्राची देखील यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही प्रणाली देखील ITR, चांदीपूर येथून प्रक्षेपित करण्यात आली.
-
पृथ्वी-२ हे ३५० किलोमीटर पर्यंत अचूकपणे लक्ष्य भेदू शकते.
-
हे लिक्विड इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे.
-
ही चाचणीही SFC च्या देखरेखीखाली पार पडली.
भारताची तांत्रिक ताकद जगासमोर : या तिन्ही यशस्वी चाचण्यांनी एकाच दिवशी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील तयारी आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेचा प्रभाव दाखवून दिला आहे. भारत आता केवळ संरक्षणात नव्हे तर तंत्रज्ञानातही सुपर पॉवर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
—————————————————————————————–



