इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाखांची सबसिडी

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ; व्याजमुक्त कर्ज आणि सत्तर टक्के पर्यंत खर्चात कपात

0
141
Google search engine

मुंबई : विशेष प्रतिनिधी

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना थेट दीड लाख रुपयांची सबसिडी आणि व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

डिझेलच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. विशेषतः शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर वापरणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

सरनाईक म्हणाले, “इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे शेतीत नवीन क्रांती घडेल. डिझेल वरील खर्च कमी होईल, पर्यावरणाचीही बचत होईल आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, डिझेलऐवजी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्यास शेतीतील ऑपरेटिंग खर्च तब्बल ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. सध्या राज्यातील अनेक भागांत नांगरणीसाठी प्रति एकर १५०० ते २००० रुपये खर्च येतो. मात्र, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या वापरामुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत (Annasaheb Patil Economic Development Corporation) इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जाणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, स्वस्त आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक फायदेशीर होणार आहे. लवकरच या योजनेच्या अधिकृत सूचना आणि अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात येणार आहेत.

———————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here