राधानगरी : प्रतिनिधी
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दाजीपूर वन्यजीव विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांना अन्न साखळीतील वाघाचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण का आवश्यक आहे, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दाजीपूर निसर्ग माहिती केंद्रातील माहिती परिक्षेत्राचे वनाधिकारी आर. डी. घुणकीकर यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.कार्यक्रमाच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याचबरोबर वनऔषधी वृक्षांची ओळखही करून देण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर यांनी दाजीपूर अभयारण्याला भेट दिली. यावेळी “वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यात काही निवडक भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. त्याचा पर्यटकांनी पुरेपूर आनंद घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वनपाल शंकर गुरव,धनाजी पाटील, अमोल चव्हाण वनरक्षक मोहन देसाई,प्रदिप खोत,दिक्षा काळेल, यमुना गावित,सुनील हराळे, राहुल पाटील,सोमनाथ पवार वनमजुर रामदास पाटील, शंकर कांबळे गोविंद केंद्रें आदी उपस्थित होते.
————————————————————————————————-