कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आकाशात चांदण्या लुकलुकतात… जरा मोठ्या चांदण्या इकडून तिकडे आकाशात फिरतात…. पौर्णिमेला चंद्र अचानक ढगाआड जातो… दिवसा कधी कधी आकाश शुभ्र असते. कुठे काळ्या ढगांचा पूजका असतो… कधी कधी आकाश फिक्कट निळे असतात… पाऊस कसा पडतो… गारा कश्या पडतात. याचे मुलाना कुतूहल असते. मुलांच्या मनातील या कुतूहलाची कारण मिमांसा होण्यासाठी दरवर्षी नासा व इस्त्रो या अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या संस्था व महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्याना संधी उपलब्ध करून देते. यावर्षी मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा दौऱ्यावर पाठवले जाणार आहे. या संस्था पहायची इच्छा आहे ना विद्यार्थी मित्रानो, तर लागा आता प्रकल्पाच्या तयारीला, मात्र रोजचा अभ्यास करूनच!
इस्रो आणि नासा या संस्था पाहण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रकल्प स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत जिंकणाऱ्या किंवा गुणवत्ता चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो व नासा दौऱ्यांसाठी निवड केली जाईल. ही संधी फक्त ५१ निवडक विध्यर्थ्याना मिळते. शालेय शिक्षण विभागाने या योजनेला मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
शालेय शिक्षण विभाग तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करतो. जिल्हा स्तरावरील स्पर्धांमधून ५१ सर्वोत्कृष्ट प्रकल्प निवडून त्यांच्या विद्यार्थ्यांना बेंगलूरू येथील भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थाला भेटीची संधी मिळेल. तर, राज्य स्तरावरील ५१ अंतिम विजेत्यांना नासा भेटीचे विशेष बक्षीस देण्यात येईल.
विजेत्यांप्रमाणेच इतर स्पर्धकही मेहनत घेतात. त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान व्हावा, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती जवळून पाहता येईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलीय.
तहसील आणि जिल्हा स्तरावरील भेटींचा खर्च जिल्हा नियोजन व विकास परिषद निधीतून केला जाईल. मात्र, नासा भेटीसाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
——————————————————————————–