बिहार : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मत चोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. बिहारातील SIR (Special Summary Revision) प्रक्रियेदरम्यान दरौंदा येथे १२४ वर्षांच्या महिला मिंता देवींची नोंद झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मतदार यादीतील अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी – हे फक्त एका जागेपुरते मर्यादित नाही, अनेक जागांवर असे प्रकार घडत आहेत. हे राष्ट्रीय पातळीवर नियोजित पद्धतीने केले जात आहे. निवडणूक आयोगालाही हे माहीत आहे आणि आम्हालाही. आधी आमच्याकडे पुरावे नव्हते, पण आता आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत. ‘ एक मतदार, एक मत ’ हा संविधानाचा आधार आहे आणि आयोगाची जबाबदारी आहे की हे काटेकोरपणे लागू करावे, पण त्यांनी तसे केले नाही.” त्यांनी पुढे म्हटले, “आम्ही थांबणार नाही. अशा अनेक प्रकरणांचा पर्दाफाश अजून बाकी आहे अभी पिक्चर बाकी है.”
दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, “ भाजपचे सर्वात मोठे काम म्हणजे षडयंत्र रचणे. SIR वर्षभर आधीही आणता आले असते, पण त्यांनी मुद्दाम आता आणले. SIR च्या बहाण्याने मोठ्या प्रमाणात जनतेचे मत कापण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज निवडणूक आयोग राहुल गांधींना शपथपत्र मागत आहे, हेच त्यांच्या भूमिकेचे उदाहरण आहे.”
दरौंदा प्रकरणामुळे SIR प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि मतदार यादीच्या अचूकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेस आणि सपा दोन्ही पक्षांनी या विषयावर निवडणूक आयोगाकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
————————————————————————————