प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेमधील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 सूत्री शांती प्रस्ताव मांडला असून तो पाकिस्तानमार्फत इराणपर्यंत पोहोचवण्यात आला आहे, या प्रस्तावामध्ये एक महिन्याचा सीजफायर, इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमावर मर्यादा, तसेच हमास आणि हिजबुल्लाहसारख्या प्रॉक्सी गटांना समर्थन बंद करण्याची अट घालण्यात आली आहे
या प्रस्तावानुसार स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली असून त्याबदल्यात अमेरिका इराणवरील काही आर्थिक निर्बंध शिथिल करण्यास तसेच संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली नागरी अणूऊर्जा कार्यक्रमास मान्यता देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे, न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार पाकिस्तानने या चर्चेत मध्यस्थाची भूमिका स्वीकारली आहे.


पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संभाव्य चर्चांमध्ये अमेरिकेकडून स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर सहभागी होण्याची शक्यता आहे, तसेच इराणची मिसाइल क्षमता कमी करणे आणि अणूऊर्जा सुविधा देशाबाहेर ठेवण्याची मागणीही या प्रस्तावात समाविष्ट आहे
दरम्यान कूटनीतिक हालचाली सुरू असतानाच अमेरिकेने मध्य पूर्वेत आणखी 3000 सैनिक तैनात केले असून या भागातील एकूण अमेरिकन सैन्याची संख्या सुमारे 50 हजारांवर पोहोचली आहे, तर संघर्ष वाढल्यास आखाती समुद्रात सुरुंग पेरण्याचा इशारा इराणने दिला आहे
तज्ज्ञांच्या मते हा प्रस्ताव पूर्वीही मांडण्यात आला होता, मात्र इराणने या अटी मान्य केल्यास ती त्यांच्या दृष्टीने मोठी माघार ठरेल, अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर नियंत्रण आणणे हेच या संघर्षाचे प्रमुख कारण असल्याचे विश्लेषकांचे मत आहे






