Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आता महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या ‘महा क्राईम OS AI’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्लॅटफॉर्मचा सध्या नागपूर ग्रामीण पोलिसांकडून प्रायोगिक वापर सुरू असून त्याला मोठे यश मिळाले आहे.

या प्रणालीमुळे पोलिसांना गुन्ह्याचा तपास करताना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळते. एफआयआर नोंदवल्यानंतर AI त्या गुन्ह्याचा तपास आराखडा तयार करून देते. कोणते पुरावे तपासायचे, पुढे कोणती कारवाई करायची याबाबत तपासी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे तपास अधिक अचूक आणि पुराव्यांवर आधारित होण्यास मदत होते.

याशिवाय संशयितांच्या कॉल डिटेल रेकॉर्डचे विश्लेषण, अधिकृत पत्रांची तयारी, तसेच सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापरही या प्लॅटफॉर्मद्वारे करता येतो. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या 133 अधिकाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले असून आतापर्यंत 300 हून अधिक गुन्ह्यांच्या तपासात या प्रणालीने मदत केली आहे.

डिसेंबर 2025 मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नडेला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर राज्याच्या गृह विभागासोबत सामंजस्य करार करण्यात आला. नागपूर ग्रामीणमधील प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये ‘महा क्राईम OS AI’ लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या आधुनिक AI प्रणालीमुळे महाराष्ट्र पोलिसांचा गुन्हे तपास अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here