नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
एलाॅन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीची उपग्रह इंटरनेट सेवा स्टारलिंक आता भारतातही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारने नुकतीच स्टारलिंकला सॅटेलाइट कम्युनिकेशन ( सॅटकॉम ) परवाना मंजूर केला असून, कंपनीने सुरुवातीला देशभरात २० लाख कनेक्शन देण्याची तयारी दर्शवली आहे. या निर्णयामुळे देशातील दुर्गम, ग्रामीण आणि नेटवर्क वंचित भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्टारलिंक म्हणजे नेमकं काय ?
स्टारलिंक ही एलाॅन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची एक सॅटेलाइट इंटरनेट सेवा आहे. तिचं उद्दिष्ट जगभरात, विशेषतः दुर्गम आणि नेटवर्कपासून दूर असलेल्या ठिकाणी अखंड आणि वेगवान इंटरनेट पोहोचवणं आहे.
पारंपरिक उपग्रह सेवांमध्ये उपग्रह पृथ्वीपासून ३५,७८६ किमी उंचीवर असतो, त्यामुळे डेटा ट्रान्सफरमध्ये उशीर होतो.
स्टारलिंकचे उपग्रह मात्र ५४०-५७० किमी उंचीवर ‘लो-अर्थ ऑर्बिट’मध्ये फिरतात, त्यामुळे इंटरनेट वेगवान आणि स्थिर मिळतो.
स्टारलिंक कसं कार्य करतं ?
स्टारलिंक एक संपूर्ण उपग्रह जाळं आहे जे ग्राहकाच्या घरी लावलेल्या स्टारलिंक किट (डिश अँटेना आणि राऊटर) शी थेट सिग्नल पाठवतो.
-
यासाठी ना केबल, ना टॉवरची गरज
-
उपग्रह थेट ग्राहक डिशशी कनेक्ट होतो
-
ग्राहक डिशमधून राऊटरकडे सिग्नल जातो आणि घरात WiFi तयार होतो
हे नेटवर्क केवळ शहरातच नव्हे, तर पर्वतरांगा, जंगलातली गावे, समुद्रकिनारी आणि बेटांवरही सेवा पुरवू शकतं जिथं सामान्य नेटवर्क पोहोचणं कठीण असतं.
भारतात स्टारलिंकची संभाव्य भूमिका
भारत सरकारनुसार, स्टारलिंकची थ्रूपुट क्षमता ६०० Gbps आहे, म्हणजेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर डेटा ट्रान्सफर शक्य होतो.
BSNL किंवा इतर स्थानिक नेटवर्क असले तरी सेवा नीट न मिळणाऱ्या भागांमध्ये स्टारलिंक एक प्रभावी पर्याय ठरू शकतो.
मंत्री पेम्मासनी चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलं की, स्टारलिंकला सध्या २० लाख कनेक्शनचीच मर्यादा आहे कारण सध्याचं उपग्रह नेटवर्क मर्यादित आहे.
भारतात स्टारलिंकसाठी किती खर्च येणार ?
स्टारलिंक भारतात सुमारे ₹ ३,००० मासिक दराने ब्रॉडबँड सेवा देण्याची योजना आखत आहे.
खर्चाचा तपशील | अंदाजे किंमत |
---|---|
स्टारलिंक किट (डिश, राऊटर, वायर इ.) | ₹ ७५,००० ते ₹८५,००० एकदाच |
मासिक शुल्क | ₹ ३,००० पर्यंत |
जिओ, एअरटेल किंवा बीएसएनएलपेक्षा महाग असलं तरी, सॅटकॉम तंत्रज्ञानासाठी ही किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच परवडणारी मानली जाते.
दुर्गम भागांमध्ये, जिथं इंटरनेटचं पर्यायच नाही तिथं ही सेवा एकमेव अशा ठरू शकते.
स्टारलिंकने जिओ-एअरटेलला टेंशन द्यायचं का ?
सध्या तरी नाही.
-
स्टारलिंकचा स्पीड २०० Mbps पर्यंत मर्यादित आहे.
-
कनेक्शन संख्याही मर्यादित (२० लाख) आहे.
-
शहरी भागात आधीच मजबूत नेटवर्क असल्यामुळे, तिथं स्टारलिंक फारसा धोका ठरणार नाही.
स्टारलिंकला आता भारतात जमिनीवरील पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत. यासाठी कंपनीला इंटरनेट उपकरणांची आयात, स्थानिक इंस्टॉलेशन, आणि दूरसंचार विभागाकडून अंतिम परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. स्टारलिंक भारतात येणं ही डिजिटल डिव्हाईड मिटवण्याच्या दिशेने एक महत्त्वाची पावलं आहे. शहरांमध्ये नाही, पण ग्रामीण आणि नेटवर्क वंचित भागांमध्ये ही सेवा क्रांती घडवू शकते. किंवा एकूणात सांगायचं झालं तर जिथं मोबाईल नेटवर्क जात नाही, तिथं स्टारलिंक पोहोचेल !
————————————————————————