मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबई आणि पुण्यातील कोकण वासियांना आपल्या मूळगावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, त्याआधी मोठ्या प्रमाणावर लोक कोकणात रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केली असून २५ जुलै २०२५ पासून या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे.
ही तिकिटे IRCTC च्या www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर, तसेच सर्व आरक्षित तिकीट खिडक्यांवर उपलब्ध असतील. कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या या विशेष गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे
दररोज धावणाऱ्या विशेष गाड्या :
1️⃣ 01152 : सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी स्पेशल
2️⃣ 01172 : सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T ) स्पेशल
3️⃣ 01154 : रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी स्पेशल
4️⃣ 01104 : सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी स्पेशल
5️⃣ 01167 : सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T ) स्पेशल
साप्ताहिक विशेष गाड्या :
6️⃣ 01166 : मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (T ) स्पेशल
7️⃣ 01186 : मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (T ) स्पेशल
8️⃣ 01130 : सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T ) स्पेशल
9️⃣ 01446 : रत्नागिरी – पुणे जंक्शन स्पेशल
🔟 01448 : रत्नागिरी – पुणे जंक्शन स्पेशल
प्रवाशांनी लवकरात लवकर आपली तिकिटे आरक्षित करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केली आहे. मागणीच्या तुलनेत गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने बुकिंग लवकर संपण्याची शक्यता आहे.
————————————————————————————–






