कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सृजनशीलतेच्या प्रवासाला समर्पित एक आगळी वेगळी संध्याकाळ अनुभवण्याची संधी रसिकांसमोर येत आहे. शुक्रवारी सायंकाळी “प्रसार माध्यम” तर्फे आयोजित “माझा लेखन प्रवास” या विशेष संवादात, युवा लेखक पुष्कर परेश मानकर आपला सर्जनशील प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडून मांडणार आहेत.
पुष्कर मानकर यांनी ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, बेंगलोर येथून बी.ए., एल.एल.बी. पूर्ण केले असून, त्यानंतर त्यांनी बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी, यूके येथून एम.ए. सृजन लेखन या शाखेत विशेष पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या लिखाणात नव्या पिढीचे विचार, अनुभव आणि सामाजिक जाणिवा यांचे अनोखे मिश्रण आढळते.
या कार्यक्रमात त्यांचा लेखनप्रवास, त्यामागील प्रेरणा, परदेशातील शिक्षणानुभव, आणि सर्जनशीलतेच्या वाटेवर आलेल्या अडथळ्यांबद्दल सखोल संवाद होणार आहे. नवोदित लेखकांसाठी आणि सर्जनशील क्षेत्रात रस असलेल्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
कार्यक्रम तपशील –
* दिनांक : शुक्रवार – २३ मे २०२५ वेळ : सायंकाळी – ६:०० वाजता
* वक्ते : पुष्कर परेश मानकर (बी.ए., एल.एल.बी. – ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, बेंगलोर / एम.ए. सृजन लेखन – बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी, यूके)
* स्थळ : प्रसार माध्यम, मुख्य कार्यालय, सारस्वत बँकेच्या वर, तिसरा मजला, राजारामपुरी, सातवी गल्ली, कोल्हापूर
————————————————————————————



