जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन

0
202
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ‘राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व” च्या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर कार्यालयामार्फत २६ जून ते ४ जुलै या कालावधीत जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य भारत केंद्रे यांनी केले आहे.

त्याअनुषंगाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी इ. १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित आहेत तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) Common Entrance Test, Joint Entrance Examination (JEE). National Eligibility Cum Entrance Test (NEET), Graduate Aptitude Test in Engineering (GATE). National Aptitude Test in Architecture (NATA) शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व ज्यांनी अद्यापपर्यंत जात पडताळणी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सादर केलेले नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी bartievaldity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा व सदर अर्ज ऑफलाईन पध्दतीने मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह सर्व मूळ कागदपत्रासह विहित मुदतीत समितीकडे सादर करण्यात यावेत.

ज्या अर्जदारांनी समितीकडे यापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत व ज्यांना समितीमार्फत त्रुटी बाबत ई-मेल द्वारे/SMS द्वारे किंवा पत्राद्वारे कळविण्यात आले आहे अशा अर्जदारांनी समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह / मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह ऑनलाईन पध्दतीने तसेच समक्ष कार्यालयात उपस्थित राहून १५ दिवसांच्या आत त्रुटींची पुर्तता करावी, असेही श्री. केंद्रे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

——————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here