कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषविलेले जेष्ठ क्रिकेटपटू सौरव गांगुली पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. तीन वर्षांपूर्वी २०१९ ते २०२२ पर्यंत बीसीसीआय अध्यक्ष म्हणूनते कार्यरत होते आणि आता त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी पुन्हा निवडणूक लढविण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी त्यांनी आपले नामांकन २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेअगोदर दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरवांचे मोठे बंधू स्नेहाशीष गांगुली आहेत यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये गांगुलीं यांनी २०१५ पासून सेक्रेटरी म्हणून प्रशसकीय कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानंतर २०१९ ला त्यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. गांगुलीच्यानंतर रोजर बिन्नी हे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ५२ वर्षांचे सौरव गांगुली पुन्हा एकदा प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुली गेल्या काही महिन्यांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांशी नियमितपणे संपर्क साधत आहे.
सीएबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘ सौरव गांगुली हे प्रशासनामध्ये परतण्यासाठी उत्सुक आहेत. सीएबी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार, त्याच्याकडे राज्यात एकूण नऊ वर्षांपैकी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. मात्र सौरव गांगुलीची अध्यक्षपदासाठी निवड एकमताने होईल की निवडणूक होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.