कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इग्लंडमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने दमदार फलंदाजी करताना एक महारेकॉर्ड केले आहे. गेल्या ९३ वर्षंच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते गिलने करून दाखवले आहे. गिलने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन टेस्टीवर २६९ धावांचा ऐतिहासिक डबल सेंच्युरी केलं आहे. जो की पहिला भारतीय फलंदाज आहे ज्याने एशियाबाहेर २५०+ धावा ठोकल्या; यात ९३ वर्षांचं इतकं मोठं अंतर आहे. सर्वात जास्त धावा करणारा गिल हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
शुभमन गिलने पहिल्या डावात दमदार द्विशतक झळकावले होते. त्रिशतक झळकावल्याची हुरहुर त्याला लागली होती. पण दुसऱ्या डावात त्याने दमदार खेळी साकारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले. दुसऱ्या कसोटीत गिलने धडाकेबाज फलंदाजी करत एक महारेकॉर्ड आता आपल्या नावावर केला आहे.
गिलने दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली खरी, पण जेव्हा पंत फलंदाजीला आला त्यानंतर गिलने आक्रमक पवित्रा धारण केला. गिलने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यानंतर त्याने इंग्लंडमधला महारेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी १९५१-५२ साली इंग्लंडमध्ये भारतीय संघ गेला होता. त्यावेळी विजय हजारे हे भारताचे नवनिर्वाचित कर्णधार होते. या पदार्पणाच्या मालिकेत विजय हजारे यांनी ३४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत एकाही कर्णधाराला आपल्या पहिल्या मालिकेत इंग्लंडमध्ये खेळत असताना ४०० धावा पूर्ण करता आल्या नव्हत्या. पण गिलने मात्र दुसऱ्या सामन्यातच आपल्या ४५० धावा पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे इंग्लंडमध्ये जे आतापर्यंत कधीच घडले नव्हते, ते गिलने करून दाखवले आहे. त्यामुळे आता गिल हा इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करत असताना सर्वाधिक धावा करणारा कॅप्टन ठरला आहे.
भारताने इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका १९३२ साली खेळली होती, पण तेव्हापासून आतापर्यंत गिलसारखी कामगिरी कोणालाच करता आलेली नाही. गिलच्या नावावर आता ही ऐतिहासिक कामगिरी झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत भारताकडून कोणत्याही फलंदाजाला जी गोष्ट करता आली नाही, तीदेखील गिलने केली आहे. कारण गिलने इंग्लंडमधील सर्वाधिक धावांचा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे, यापूर्वी हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. सुनील गावस्कर यांनी इंग्लंडमध्ये १९७९ साली २२१ धावा केल्या होत्या.
—————————————————————————————–