राधानगरी : प्रसारमाध्यम न्यूज
राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील स्माईल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रुती संदीप पाटील हिची उंतुगतेज बालवैज्ञानिक फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या परीक्षेमधून इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी भविष्यात शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहावे या उद्देशाने फाऊंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर हालगे यांनी ‘मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे’ ही चळवळ हाती घेतली आहे. ही निवड लेखी आणि मुलखतीद्वारे केली आहे. या निवडसाठी श्रुती हिला शाळेचे अध्यक्ष संजय जाधव, मुख्याध्यापिका सारिका जाधव आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.