कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शंभुराजे विकास मंचच्या वतीने रांगणा किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्या आला. या शिवराज्याभिषेक सोहळ्याला शंभुराजे विकास मंचचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंचाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
शंभुराजे विकास मंचच्या वतीने प्रत्येक वर्षी रांगणा किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. या मंचाचे संस्थापक अध्यक्ष कै. सुरज ढोली यांनी रांगणा किल्ल्यावर पायी चालत जाऊन शिवराज्याभिषेक सोहळा करण्याची परंपरा सुरु केली होती ती आजही सुरु आहे. त्याचबरोबर विजयदुर्ग, पन्हाळा, भुदरगड, पारगड, इत्यादी किल्ल्यांवरसुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला आहे.

रांगणा किल्ल्यावर गडदेवता रांगणाई देवीची पूजा करण्यात आली. यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला . यावेळी संग्राम ढोली यांनी विधीवत वेद मंत्र पठण केले. शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सदर करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा शितल ढोली यांच्या मार्गदर्शना खाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी जोतिबा, कुशिरे, पोहाळे, कोल्हापूर आणि परिसरातून मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.



