spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकलाएकांकिका स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ प्रथम

एकांकिका स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ प्रथम

सांगली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे आयोजित पी.एन.जी. महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाने सादर केलेली ‘चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध’ ही एकांकिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील महाविद्यालयीन पथकांनी दर्जेदार प्रयोग सादर करून रसिकांची मनं जिंकली. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात पी.एन.जी.चे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते 
  • प्रथम क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध

  • द्वितीय क्रमांक : मॉडर्न महाविद्यालय, पुणे – वामन आख्यान

  • तृतीय क्रमांक : संगमनेर महाविद्यालय, सोलापूर – प्रेम की यातना

उत्तेजनार्थ 
    • मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे – बोहाडा,
    • देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर – ग्वाही
वैयक्तिक पारितोषिके
  • दिग्दर्शन : कादंबरी माळी (प्रथम), अनिकेत खरात (द्वितीय), दीपक शिंदे (तृतीय)
  • स्त्री अभिनय : कादंबरी माळी (प्रथम), केतकी भाळवणकर (द्वितीय), अक्षता बारटक्के (तृतीय).
    उत्तेजनार्थ – पूर्वा जोतावर, संयोगिता चौधरी, वैष्णवी कुंभार, स्वरा जोग, मृणाल पाटील.
  • पुरुष अभिनय : जैद शेख (प्रथम), प्रांजल पडळकर (द्वितीय), मुकुल ढेकळे (तृतीय).
    उत्तेजनार्थ – अभिनव तोरणे, अभिषेक हिरेमठ, भूषण चांदणे, राजस बर्वे. 

या समारंभाला नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य संदीप पाटील, नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, सांगली शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर ताम्हनकर, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे, तसेच स्पर्धा समितीचे अध्यक्ष सचिन पारेख उपस्थित होते.

नरेंद्र आमले आणि सौ. मधुवंती हसबनीस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आमले यांनी कलाकार व तंत्रज्ञांना इतरांचे प्रयोग पाहून आपली अभिव्यक्ती घडवण्याचा सल्ला दिला.

संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांनी आपल्या भाषणात “महाविद्यालयीन तरुणांच्या या प्रयोगांतून मराठी रंगभूमीचे भवितव्य उज्वल आहे” असा विश्वास व्यक्त केला. पी.एन.जी. महाकरंडक स्पर्धेला मिळत असलेला राज्यस्तरीय स्वरूपाचा प्रतिसाद सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक स्वागत प्रा. डॉ. ताम्हनकर यांनी केले. सचिन पारेख यांनी स्पर्धेचा आढावा घेतला, तर विशाल कुलकर्णी आणि शशांक लिमये यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले.

—————————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments