शिवाजी विद्यापीठाकडून ६५ ‘स्टार्ट-अप’ना प्रोत्साहन ; मंथली इनोव्हेशन चॅलेंजचा लाभ घेण्याचे आवाहन

0
127
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शिवाजी विद्यापीठाच्या ‘एसयुके रिसर्च अँड फौंडेशन’ या इनक्युबेशन सेंटरमध्ये शेती, संगणक, रसायन, आरोग्य, पर्यावरण, अन्नप्रक्रिया इत्यादीं मधील ६५ स्टार्टअप उद्योगांना बळ देण्यात येत असून या माध्यमातून नवउद्योगांना विविध वित्त संस्थांकडून बीज भांडवलही देण्यात आले आहे. स्टार्ट-अप सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आता मंथली इनोव्हेशन चॅलेंजद्वारे ही संधी चालून आली आहे. ही माहिती संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी दिली.

डॉ. डेळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटर मध्ये विद्यार्थी, संशोधक व नागरिकांना समाजातील विविध समस्यांवर नाविन्यपूर्ण उत्तरे व समाधान सुचविण्याची संधी ”मंथली इनोव्हेशन चॅलेंज” या उपक्रमातून देण्यात आली. नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यावरील उद्योग याबाबत केंद्रातून नवयुवकांना उद्योजकतेच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या निवड झालेल्या स्टार्टअप्सना महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र राज्य, स्टार्टअप इंडिया, केंद्र सरकार, एमएसएमई, सारथी यांसह इतर शासकीय व खाजगी संस्थांकडून बीजभांडवल मिळण्याची संधी आहे. तरी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी आपल्या कल्पना १५ जून २०२५ पर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवर न्यूज अँड इव्हेंटस् या विभागात जाऊन गुगल फॉर्ममध्ये भराव्यात व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here