प्रसारमाध्यम : शाहुवाडी
ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड या शिवकालीन मार्गामध्ये बदल केल्यास तिव्र अंदोलन करण्यात येईल, असा इशारा एका निवेदनाव्दारे शाहुवाडी तहसीलदारांना शिवभक्तांनी दिला आहे.
शाहुवाडी तालुक्यातील खोतवाडी पैकी धनगरवाडा , म्हांडलाईवाडी, करपेवाडी , आंबेवाडी , कळकेवाडी, रिंगेवाडी, माळेवाडी सुकामाचामाळ ,म्हाळसवडे पैकी धनगरवाडा, पांढरेपानी, पावनखिंड इजिमा क १३ हा ऐतिहासीक शिवकालीन मार्ग आहे सदर मार्गावरील म्हांडलाईवाडी पर्यंतचे काम सध्या पूर्ण झालेले आहे . तर त्यापुढील उर्वरीत काम पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण असून या ऐतिहासिक मार्गामध्ये बदल करून काही मंडळी स्वार्थापोटी हा मार्ग चुकीचा आहे असे भासवून त्या रस्त्याचे काम हे करपेवाडी पैकी धनगरवाडा वगळून चुकीच्या मार्गावरून करण्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. या रस्त्याचे काम शिवकालीन मार्गानेच व्हावे, अशी शिवभकतांची मागणी आहे.
हे निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार , दिनकर लोहार,योगेश कुलकर्णी, पांडूरंग रवंदे, कृष्णात दिंडे आदी उपस्थित होते..