कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने वस्ताद कै. सुरज ढोली यांनी सुरु केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेले शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले.
या शिबिरात मुला-मुलींसोबत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शिबिरामध्ये लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा या सारख्या पारंपरिक शस्त्रांचे प्रशिक्षण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यासोबतच, सहभागींना नेमबाजी, मेडिटेशन, प्राणायाम आणि विविध साहसी खेळांचेही प्रशिक्षण मिळाले.
अध्यक्षा श्रीमती शितल ढोली म्हणाल्या, या शिबिरामुळे युवा पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि मर्दानी खेळांच्या परंपरेची माहिती मिळाली, तसेच शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली,याच उद्देशानी या शिबिरांचे आम्ही संस्थेच्या वतीने गेली १५ वर्षे आयोजन करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
शिबिराच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मुर्ती व मंदिर अभ्यासक अँड. प्रसन्न मालेकर, ऑलपिंक शुटिंग रेंजर विनय पाटील, ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबो, अनिकेत जुगदार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन धनाजी उपारे यांनी केले तर आभार ज्योती जाधव यांनी मानले.
——————————————————————————————–