
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घालण्यात आले. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आज शुक्रवारी मुंबईत बैठक होत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी त्याचबरोबर शक्तीपीठ विरोधी कृती समितीने, मात्र, हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून हा महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडे अंबाबाईला घातले.
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. या मागणीसाठी आज साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला, इंडिया आघाडी आणि शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीन साकडे घालण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा महामार्ग विकासाकडे नाही तर विनाशाकडे नेणारा आहे. म्हणून हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले. यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. अशी एक मुखाने मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी – शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यांतून विरोध होत असताना कोल्हापूर जिल्ह्यांतून याला विरोध नाही. असे भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. ५० हजार कोटीचा यामध्ये ढपला पाडला जाणार आहे. यामध्ये आपणाला काही मिळेल काय या अशानेच काही लोक याच समर्थन करत आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांच नाव न घेता लगावला. जे आमदार मुंबईमध्ये शक्ती पिठाच्या समर्थनार्थ बैठक घेणार आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या जनतेन त्यांना मत देऊन निवडून दिले आहे. हे विसरू नये.
शक्तीपीठ महामार्गामुळ अर्धे कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या महामार्गामुळे जाणार आहेत. शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे, आई अंबाबाई सरकारला सुबुद्धी दे.. या महाराष्ट्रावरचं शक्ती पिठाचं संकट टळू दे… असं साकडं घालण्यात आलं. तर यावेळी श्री अंबाबाई ची आरती देखील करण्यात आली.
उपस्थिती- शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवि इंगवले, राजू लाटकर, आर के पोवार, सचिन चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, अनिल घाटगे, प्रकाश पाटील, तौफीक मुल्लाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, आदिसह शेतकरी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
—————————————————————————————–






