spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeशासकीय योजनास्कूल व्हॅन परवाने लवकरच खुले

स्कूल व्हॅन परवाने लवकरच खुले

अधिसूचना लवकरच जारी होईल,- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

विद्यार्थ्याना शाळेत सोडण्यासाठी स्कूल बस बरोबरच रिक्षांचा वापर होत आहे. स्कूल बसचे भाडे जास्त असल्याने आणि काही शाळांच्या स्कूल बस नसल्याने रिक्षांचा वापर विद्यार्थी वाहतुकीसाठी वाढला आहे. यावर परिवहन विभागाने मार्ग काढला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. ही वाहने BS-VI या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य सरकारकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकानुसार राज्य सरकारने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे.

स्कूल बसचे भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षांचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

स्कूल व्हॅन अशी असेल : जीपीएस यंत्रणेने सुसज्ज, सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन, अग्निशमन अलार्म प्रणाली, दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा, ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर, पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे, स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी, गाडीच्या छतावर शाळेचे नाव.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments