कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयीचा निकाल जाहीर केल्याने, सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरच्या दोन महापालिका, जिल्हा परिषद, दहा नगरपालिका, ३ नगरपंचायत आणि १३ नगरपरिषद यांच्या निवडणुका होणार आहेत. सुमारे ४ वर्षे या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयीचा निकाल जाहीर केल्याने निम शहरी भागातील राजकारण तापले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांची मुदत २०२१ मध्ये संपल्या होत्या. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या तांत्रिक अडचणींमुळे आणि राजकीय घडामोडींमुळे या निवडणुका प्रलंबित पडत गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयीचा निकाल जाहीर झाल्याने १३ नगरपरिषदांच्या निवडणुकांचा मार्ग रिकामा झाला आहे. या निवडणुकांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
निवडणुका होणाऱ्या नगरपरिषदा :
जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, कागल, मुरगूड, गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, हुपरी
राजकीय परिस्थिती :
सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत बंड झाल्याने भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिघे एकत्र आहेत तर विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीत कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे तीन पक्ष एकत्र आहे. सध्या महायुतीमध्ये अगदी ग्रामीण भागांमधून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेऊन पक्ष प्रवेश होताना दिसत आहे. यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला नवख्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.